संस्थेची इमारत जस जशी जुनी होत जाईल त्याप्रमाणे तिथे राहणाऱ्या सभासदांना संस्थेच्या पुनर्विकास करण्यासाठी सभासद व व्यवस्थापन समिती प्रयत्न करताना आपणास दिसून येते. त्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि उपविधीने घालून दिलेल्या तरतुदीनुसार हि प्रक्रिया पार पाडणे गरजेचे असते परंतु बऱ्याच संस्थाकडून या तरतुदींचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पुढे कायदेशीर पेच निर्माण होऊन पुनर्विकास प्रक्रियेला खीळ बसलेली आपल्याला दिसून येत. पुनर्विकास करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात आणि कशा पध्तीने सदर प्रक्रिया पार पडावी याबाबत आपण पाहणार आहोत.
१) पुनर्विकास करण्यासाठी किमान १/४ सभासदांनी त्याची मागणी करणे आवश्यक आहे.
२) सदर मागणी केल्यानंतर ३० दिवसांच्या आता विशेष सर्वसाधारण सभा बोलाविणे आवशयक असते.
३) या सभेचा अजेंडा १४ दिवस अगोदर प्रत्येक सभासदास पाठविणे बंधनकारक आहे.
४) या सभेच्या ८ दिवस अगोदर पर्यंत सभासदांना पुनर्विकास बद्दल लेखी सूचना संस्थेच्या सचिवांकडे देता येतील.
५)पुनर्विकास करण्याचा ठराव झाल्यानंतर आर्किटेक्ट व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांची नियुक्ती करावी.
६) आर्किटेक्ट दोन महिन्यात प्रकल्प अहवाल बनवतील, अहवाल तयार करताना सभासदांकडून आलेल्या सूचनां यांचा विचार करून अहवाल सदर करतील.
७) प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट कायदेशीर बाबींची पडताळणी करून व त्यांची पूर्तता करतील.
८) अहवाल समितीला भेटल्यानंतर सदर अहवाल सभासदांना पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध करून द्यावा.
९) आर्किटेक्ट व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि व्यवस्थापक समिती सदस्य यांची संयुक्त सभा घेणे गरजेचे आहे या सभेची जाहीर नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्डावर लावणे बंधनकारक. तसेच सभासदांच्या आलेल्या सूचनांचा विचार या सभेत करावा लागेल.
१०) सभा झाल्यावर व्यवस्थापन समितीने निविदा मसुदा तयार करावा आणि निविदा मागवाव्यात.
११) आलेल्या सर्व निविदांची यादी तयार करून संस्थेच्या नोटीस बोर्ड वर लावणे.
१२) निविदा जमा करण्याच्या शेवटच्या ताखेपासून १५ दिवसात व्यवस्थापन समितीने सभा घेऊन या सभेत आलेल्या निविदा उघडून त्या सर्वांचा एक तक्ता बनवावा.
१३) विशेष सर्वसाधारण सभा बोलावणेसाठी सचिव निबंधकाकडे प्राधिकृत अधिकारी मिळणेसाठी आठ दिवसांत अर्ज करेल.
१४) उपनिबंधक विशेष साधारण सभा बोलाविणेसाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करतील.
१५) प्राधिकृत अधिकारी एक महिन्याचे आत विशेष साधारण सभा बोलवतील.
१६) सभेस निबंधक कार्यालयातील अधिकारी यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून हजार राहणे बंधनकारक आहे.
१७) या सभेचे व्ही. डी. ओ. चित्रिकरण करणे आवश्यक आहे.
१८) सभेस फक्त सभासदास हजर राहता येईल. सभासदाने स्वत: चे ओळखपत्र बरोबर ठेवणे आवश्यक राहील.
१९) सदर सर्वसाधारण सभेत एकूण सभासद संख्येच्या ३/४ हि कोरम असणे आवश्यक आहे.
२०) कोरम पूर्ण न झाल्यास सभा ८ दिवसासाठी तहकूब करण्यात येईल, या तहकूब सभेत सुद्धा कोरम पूर्ण न झाल्यास सभा रद्द करण्यात येईल. हा विषय पुढील एक वर्ष सर्वसाधारण सभेसमोर आणता येणार नाही.
२१) दहा दिवसात सभेचे इतिवृत्त सभासदांना व निबंधक कार्यालयास जमा करणे आवश्यक आहे.
२२) उपस्थित सभासदांच्या ३/४ इतक्या बहुमताने लेखी मान्यतेने विकासकाची नियुक्ती होईल व अटी/शर्ती सह निविदा अंतिम करतील.
२३) विशेष सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार एक महिन्याचे आत गृहनिर्माण संस्था व विकासक करारनामा करतील.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/९७३०५७५८६८