हंगामी समितीचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो तर त्यानंतर येणाऱ्या समितीचा कार्यकाळ हा पाच (५) वर्षाचा असतो. सदर समितीने कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी संस्थेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे असते. निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नवीन व्यवस्थापक समितीस पदभार देताना पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे:
१) विध्यमान व्यवस्थापन समितीने त्यांच्या कार्यकाळात केलेल्या सर्व कामकाजाचे लेखाजोखा व त्यांच्याकडे पूर्वीच्या समितीने सुपूर्त केले सर्व कागदपत्र यांची यादी बनवावी.
२) विध्यमान व्यवस्थापन समितीने यादी प्रमाणे सर्व कागदपत्र तपासून घेणे.
३) नवनिर्वाचित समितीने अध्यक्ष/ चेअरमन व इतर पदाधिकारी यांची निवड करणे.
४) विध्यमान व्यवस्थापन समिती मधील अध्यक्ष व सचिव यांनी नवनिर्वाचित समितीमधील अध्यक्ष व सचिव यांना यादी व कागदपत्र सुपूर्त करणे.
५) नवनिर्वाचित समितीमधील अध्यक्ष व सचिव यांनी मिळालेली यादी व कागदपत्र तपासून घेणे.
६) सर्व कागदपत्र यादी प्रमाणेअसल्याची खात्री झाल्यावर विध्यमान व नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांनी कार्यभार सुपूर्त केल्याच्या पत्रावर सही करून ते दप्तरी ठेवणे.
७) कार्यभार मिळाल्यानंतर नवनिर्वाचित समितीने कामकाज पुढे चालू करावे
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment