सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य होण्यासाठी पात्र व्यक्ती/ विविध संस्था ( उपविधीप्रमाणे ) यांनी विहीत नमुन्या मध्ये संस्थेच्या सदस्यत्वासाठी अर्ज करताना खालील शर्तींची पुर्तता करणे आवश्यक आहे. सदर शर्तींची पूर्तता केली आहे किंवा नाही हे तपासून व्यवस्थापन समितीकडून त्या व्यक्ती/ संस्थेस सदस्य म्हणून दाखल करून घेतले जाईल.
१) सदस्यत्वासाठी करावयाच्या अर्जासोबत कमीत कमी दहा भागांची रक्कम पूर्णपणे भरलेली हवी.
२) सदस्यत्वासाठी विहीत अर्जासोबत १००/- रुपये प्रवेश फी भरली पाहिजे.
३) संस्थेच्या कार्यकारी क्षेत्रामध्ये अन्यत्र कोठेही त्याच्या अगर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे मालकीचे घर, भूखंड अथवा सदनिका असल्यास त्या बाबतचा तपशील विहीत नमुन्यातील अर्जात व प्रतिज्ञापत्रात सादर करणे आवश्यक आहे.
४) ज्या कारणासाठी सदनिका खरेदी केली आहे त्याच कारणासाठी ती वापरण्यात येईल, अशा अर्थाचे विहीत नमुन्यात त्याने हमीपत्र दिले आहे.
५) स्वतंत्र उत्पनाचे साधन नसेल तर, त्याने त्याबाबत नमुन्यात हमीपत्र सादर केले आहे.
६) संस्थेच्या सदस्यत्वासाठी त्याने सादर केलेल्या अर्जासोबत त्याने महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका बाबत अधिनियम याच्या कलम ४ अन्वये प्रवर्तक (बांधकाम व्यवसाईक) यांच्या बरोबर किंवा हस्तांतरका बरोबर केलेल्या करारपत्राचे योग्य मुद्रांक शुल्क भरल्याची प्रमाणित प्रत सादर केली आहे.
७) त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार आवशक असल्याप्रमाणे विहीत नमुन्यात हमीपत्रे, घोषणापत्र आणि संस्थेच्या उपविधीनुसार आवश्यक असलेली अन्य माहिती सदस्यत्वाच्या अर्जासोबत त्याने सादर केली आहे.
८) सिडको/म्हाडा/एसआरअे/एमएमआरडीअे या विशिष्ठ नियोजन प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्राखाली नोंदविण्यात आलेल्या संस्थांच्या बाबतीत अर्जदार हा संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार आणि (असल्यास) शासन/नियोजन प्राधिकरण यांच्या निदेशक तत्वाखाली पात्र असला पाहिजे.
विक्री न झालेल्या सदनिकांच्या संबंधात संस्थेच्या सदस्यत्वासाठी अर्ज करणारे प्रवर्तक (बांधकाम व्यवसाईक) यांना, वर नमूद केलेल्या शर्ती पैकी (३),(४),(५),व (७) या शर्ती लागू असणार नाहीत.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment