संस्थेच्या उपविधी मध्ये नमूद केलेल्या प्रमाणे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेणे अनिवार्य आहे. स्ट्रक्चरल ऑडीट मध्ये संस्थेच्या इमारतीचे ऑडीट केले जाते आणि सदर इमारत राहण्या योग्य आहे का? तसेच तिथे राहणाऱ्या सभासदांना इमारतीचा धोका आहे किंवा नाही याबाबत अहवाल संस्थेस दिला जातो. या अहवालाच्या आधारे संस्थेतील सभासदांना पुढील निर्णय घेण्यास सुलभता प्राप्त होते उदा. अहवालात छोट्या दुरुस्ती सुचविल्यास त्याबाबत निर्णय घेऊन त्या वेळेत पूर्ण करून घेणे, तसेच इमारत जास्त धोकादायक स्थितीत असेल तर इमारत रिकामी करून स्थलांतर करणे, इमारतीचा पुनर्विकास करणेइ. बऱ्याच वेळा व्यवस्थापन समिती कडून याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा याबाबत जास्त माहिती नसल्याने दुर्लक्ष होते.
अ) संस्थेच्या इमारतीचे वय १५ ते ३० यामध्ये असेल तर ५ (पाच) वर्षाला एकदा स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे.
ब) संस्थेच्या इमारतीचे वय ३० वर्ष किंवा ३० वर्षपेक्षा जास्त असेल तर ३ (तीन) वर्षाला एकदा स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे.
स्ट्रक्चरल ऑडीट हे स्ट्रक्चरल इंजिनिअर ज्यांना महानगरपालिके कडून लायसन्स प्राप्त आहे अशा व्यक्ती / संस्थाकडून करून घ्यावे.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment