उपविधीत नमूद केल्याप्रमाणे संस्थेच्या नावे जमिनीचे व इमारतीचे हस्तांतरण करणे हे एक महत्वाचे उद्दिष्ट असते. या पूर्वी आपण अभिहस्तांतरण व मानीव अभिहस्तांतरण या मधील फरक समजून घेतला तसेच हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी कोणती ते पहिले. हि प्रक्रिया पूर्ण करताना महत्वाचा टप्पा असतो तो अभिहस्तांतरण व मानीव अभिहस्तांतरण दस्त नोंदणीचा. सदर दस्त नोंदणी करताना योग्य ते मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे असते. ते मुदांक शुल्क किती भरावे लागते या बाबत आज आपण काही माहिती जाणून घेणार आहोत, ती पुढीलप्रमाणे:
अ) जर सर्व सदनिका/ गाळे धारकांनी खरेदी वेळी योग्य ते मुद्रांक शुल्क भरले असेल व FSI शिल्लक नसेल तर रु.१००/- मुद्रांक शुल्क भरावे.
ब) जर सर्व सदनिका/ गाळे धारकांनी खरेदी वेळी योग्य ते मुद्रांक शुल्क भरले नसेल किंवा FSI शिल्लक असेल तर सदर प्रकरण अभिनार्णय करण्यसाठी JDR कार्यालयात जमा करून त्यांच्या आदेशा प्रमाने भरावे. जर एखाद्या सदनिका/ गाळे धारकांनी कमी किंवा मुदांक शुल्क भरले नसल्यास ते मुदांक शुल्क वैयक्तिक त्या सदनिका / गाळेधारकाने भरणे आवश्यक आहे. संस्था नोंदणी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी स्वत: मुदांक शुल्क भरून ते रितसर सादर सदनिका / गाळेधारका कडून वसूल करू शकते.
मुद्रांक शुल्क जर रु.१०० असेल तर नोंदणी शुल्क रु.१०० आणि जर मुदांक शुल्क जास्त असेल तर १% ( जास्तीत जास्त ३००००) इतके असेल.
दस्त हाताळणी फी रु.२० प्रत्येक पानांसाठी भरावी लागते.
वरीलप्रमाणे मुद्रांक शुल्क, दस्त नोंदणी शुल्क आणि दस्त हाताळणी फी दस्त नोंदणी पूर्वी भरावी लागते.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
(फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८)
No comments:
Post a Comment