सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये बऱ्याच वेळा ठराविक पदाधिकाऱ्याकडून मनमानी कारभार करणे किंवा व्यवस्थापन समिती मधील इतर सदस्यांना विचारात न घेता निर्णय घेणे अशा वेळेस समिती मधील इतर सभासद अविश्वास ठराव पास करू शकतात. पदाधिकाऱ्याविरुध्द अविश्वासाचा असा ठराव कलम ७३ आय .डी. (१) (२) नुसार दाखल करता येतो. सदर ठराव पास करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे असते:
१) समिती सदस्यांपैकी किमान १/३ सदस्यांनी सह्या करून संबंधित सहाय्यक / उपनिबंधक कार्यालयाकडे ठराव देणे आवश्यक असते. सदर ठराव नमुना ए १८ मध्ये द्यावा.
२) सदर ठराव निबंधकांना प्राप्त झाल्यानंतर सात (७) दिवसांच्या आतसहकार कायद्यातील तरतुदी प्रमाणे प्राधिकृत अधिकारी नेमणे गरजेचे असते तसेच व्यवस्थापक समितीमध्ये ठरावासाठी सभा घेण्याचे आदेश देणे आवश्यक असते.
३) निबंधकांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याकने कलम ७३ आय .डी (३) नुसार पुढील कार्यवाही पूर्ण आवश्यक असते:
सभेच्या आदेशाच्या / नोटिशीच्या तारखे पासून १५ दिवसात सदर सभा आयोजित करणे.
हि सभा कोणत्याही कारणासाठी तहकूब करता येत नाही.
या सभेत व्यवस्थापक समितीच्या सदस्य संख्येच्या २/३ इतक्या बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर होतो किंवा नाही याची नोंद घेणे.
ठराव मंजूर झाल्यावर सहकार कायद्यांतर्गत नियम ५७ (v) (७) नुसार निर्धारित केलेल्या एम -१ नमुन्यात अविश्वासाचा ठरावाबाबतचा निर्णय देणे.
अविश्वास ठराव नामंजूर झाल्यास नव्याने अविश्वास ठराव किमान ६ महिने दाखल करता येणार नाही.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
(फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८)
No comments:
Post a Comment