१) संस्थेच्या नावावर जागा व इमारतीचे हस्तांतरण झाल्याने संस्था पूर्ण पणे मालक बनते.
२) जागा व इमारतीचे हस्तांतरण झाल्याने वाढीव एफ. एस. आय. (FSI)/टी. डी.आर(TDR) च्या हक्का बाबत बिल्डर प्रमोटर व संस्था यांच्या मध्ये होणारा वाद संपुष्टात येण्यास मदत होते.
३) संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय जलद गतीने घेणे शक्य होते.
४) संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी विकासका बरोबर जास्तीची जागा सर्व सभासदांना मिळावी यासाठी मद्त होते कारण तुमच्या जागेचा मालकी हक्क संस्थेकडे असतो.
५) बिल्डर प्रवर्तक संस्थेला विचारात न घेता सुधारित बांधकाम मंजूर करून घेऊ शकत नाही.
६) स्थानिक प्राधिकरण किंवा सरकारने रस्ता रुंदीकरणासाठी जर संस्थेची जागेचा ताबा घेतल्यास त्याचा मिळणारा मोबदला संस्थेस मिळतो.
७) संस्थेला उत्पन्न मिळण्यास मदत होते उदा. टेरेस वर मोबाईल टॉवर किंवा जहिरात फलक बसविल्यास त्याचे उत्पन्न संस्थेस भेटू शकते.
८) मूळ मालक/ बिल्डर प्रमोटर जागेवर दावा/ अधिकार दाखवू शकत नाही.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment