Tuesday, 29 June 2021

नियमित अभिहस्तांतरण ( Conveyance Deed) व मानीव आभीहस्तांतरण ( Deemed Conveyance) साठी आवश्यक कागदपत्र कोणती?

इमारत आणि जमीन यांचे नोंदणीकृत दस्ताद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा इतर वैधानिक संस्थेच्या नावे हस्तांतरण करण्याकरिता काही आवश्यक कागदपत्रे संस्थेस जोडावी लागतात, सदर कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे:

१) संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र

२) सर्व सभासदांची सूची II ( Index II) 

३) बिल्डर प्रमोटर व कोणत्याही एका सदनिका धारक यांच्यामध्ये झालेल्या कराराची प्रत

४) मंजूर नकाशा

५) एन. ए. ऑर्डर

६) बांधकाम चालू करण्याचा परवाना

७) भोगवटा प्रमाणपत्र / बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दोन्ही नसेल तर तसे प्रतिज्ञा पत्र

८) वकिलांचा सर्च रिपोर्ट

९) सहकार खात्याने दिलेल्या स्वरुपात आर्किटेकचा दाखला

१०) जमिनीचा सात बारा (७/१२)

११) विकसन करार, जमीन खरेदीखत, भागीदारी पत्र जर असेल तर


धन्यवाद!

श्री. सचिन जगताप  

फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


Monday, 28 June 2021

नियमित अभिहस्तांतरण ( Conveyance Deed) व मानीव आभीहस्तांतरण ( Deemed Conveyance) म्हणजे काय ?

अभिहस्तांतरण:- इमारत आणि जमीन यांचे नोंदणीकृत दस्ताद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा इतर वैधानिक संस्थेच्या नावे हस्तांतरण करणे म्हणजे अभिहस्तांतरण होय.

सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा इतर वैधानिक संस्थेची नोंदणी पूर्ण झाल्यावर चार (४) महिन्याच्या आत बिल्डर प्रमोटर्स यांनी इमारत व जागेचे हस्तांतरण करून देणे बंधनकारक आहे. परंतु बऱ्याचवेळा याचे पालन केले जात नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने मालकी हक्क अधिनियम १९६३ (MOFA) मध्ये सुधारणा केल्या व मानीव अभिहस्तांतरण हि प्रक्रिया समाविष्ट करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना अभिहस्तांतरण करण्याचे आदेश देण्याचा अधिकार दिला गेला. या प्रक्रियेत  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे सक्षम अधिकारी/ प्राधिकृत अधिकारी म्हणून संस्थेची व बिल्डर प्रमोटर्स, जागा मालक यांची बाजू ऐकून घेतात आणि त्यांचा आदेश देतात. 

 

अ) नियमित अभिहस्तांतरण ( Conveyance Deed): सध्या शब्दांमध्ये सांगायचं झाल तर जेंव्हा बिल्डर प्रमोटर्स/ विकासक व जमीन मालक स्वतः जागा व इमारतीचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करून देण्यास तयार होतात व टी प्रक्रिया पूर्ण करतात त्यास नियमित अभिहस्तांतरण ( Conveyance Deed) असे म्हणतात.    या प्रक्रीये मध्ये बिल्डर प्रमोटर्स व जमीन मालक स्वतः अभिहस्तांतरणचा दस्त ऐवज तयार करतात व  दुय्यम निबंधक नोंदणी अधिकारी यांच्या समोर सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतात. 

ब) मानीव अभिहस्तांतरण ( Deemed Conveyance): जेंव्हा बिल्डर प्रमोटर्स/ विकासक व जमीन मालक स्वतः जागा व इमारतीचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करून देण्यास तयार नसतात किंवा काही आटी टाकून हस्तातरण करण्यास तयार होतात पण अशा आटी संस्थेस मान्य नसतात अशा परीस्थित संस्था प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर मानीव अभिहस्तांतरणाचा अर्ज दाखल करते, आपली बाजू मांडते. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित प्राधिकृत अधिकारी अभिहस्तांतरण संबंधी योग्य ते आदेश पारित करतो. अभिहस्तांतरण करण्याचा आदेश पारित झाल्यानंतर दस्तावर सही करून नोंदणी आणि अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी नेमला जातो.  या प्रक्रियेद्वारे जागा व इमारतीचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करून घेणे म्हणजे मानीव अभिहस्तांतरण होय. 

धन्यवाद!

श्री. सचिन जगताप  

फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


सहकारी संस्थांच्या निबंधकाच्या अखत्यारीतील तक्रारीचे विषय कोण कोणते असतात?

 निबंधक म्हणजे ज्या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण अथवा इतर सहकारी संस्था नोंद केल्या जातात असे सहकार खात्याचे कार्यालय. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र असे निबंधक यांचे कार्यालय असते. म्हणजेच तालुका/ शहर असेल तर शहरातील विभाग नुसार. सहकारी संस्थेबाबत अथवा पदाधिकारी किंवा सभासद यांच्या विषयी काही तक्रारी निबंधक कार्यालयात करता येतात. अशा तक्रारीवर सहकार कायद्यानुसार निर्णय देण्याचा अधिकार निबंधकांना असतो. निबंधक कार्यालयात खालील प्रकारच्या विषयांवर तक्रार दाखल करता येते. 

१) संस्थेची ठराविक मुदतीत वार्षिक सर्वसाधारण सभा न घेतल्यास त्याबाबतची तक्रार

२) संस्थेच्या उपविधीप्रमाणे व्यवस्थापन समितीची बैठका आयोजित न केल्याबाबत. 

३) व्यवस्थापन समितीची मुदत संपण्यापूर्वी पुढील निवडणुकांची व्यवस्था न करणेबाबत.

४) उमेदवारी अर्ज नाकारल्याबाबत

५) जास्तीच्या हस्तांतरण शुल्काची मागणी केल्याबाबत

६) नॉन ऑक्यूपन्सी चार्जेस बाबत 

७) संस्थेचे सभासद करून घेत नसल्याबाबत

८) भाग दाखले / शेअर सर्टिफिकेट न दिल्याबाबत

९) नॉमिनेश / नामनिर्देशन करून न घेणे किंवा नोंद न करणे

१०) सहयोगी सभासद अर्जावर निर्णय न  घेणे

११)  मागणी केलेल्या कागदपत्रांच्या प्रति/ नकला न देणे

१२) खोटी माहिती देऊन संस्थेची नोंद करणे

१३) आर्थिक गैरव्यवहाराबाबतची तक्रार

१४) नोंदवह्या तसेच इतर कागदपत्रांमध्ये खाडाखोड करणे

१५)  संस्थेच्या उपविधीप्रमाणे देखभाल निधी अथवा इतर निधी न घेता जास्तीचा निधी घेतल्याबाबत

१६) पत्रव्यवहार न स्वीकारणे याबाबत

१७) संस्थेच्या निधीचा दुरुपयोग केल्याबाबत

१८) ठराविक कालावधी मध्ये हिशोब पत्रके तयार न केल्याबाबत

१९) लेखापरीक्षण वेळेत पूर्ण करून न घेतल्याबाबत 

२०) उपविधीप्रमाणे कामकाज न केल्याबाबत

२१) देखभाल शुल्क व इतर शुल्क यांच्या थकबाकी बाबत

मुख्यत: वरील विषयांवर निबंधक कार्यालयात तक्रार दाखल करता येते. तसेच इतर विषयांवर जे निबंधक यांच्या कार्यकक्षेत/ अखत्यारीत येतात त्याबाबत हि तक्रार दाखल करता येते.


धन्यवाद!

श्री. सचिन जगताप  

फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


Friday, 25 June 2021

सहकारी गृहनिर्माण संस्थेने सभासदांना कागदपत्रांच्या / दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रति (नकला) पुरविताना किती फी घ्यावी ?

 उत्तर :- बऱ्याचवेळा संस्थेतील सभासद व्यवस्थापन समितीकडे वेगवेगळ्या कागदपत्रांची/दस्तऐवजांची मागणी करतात. सदर कागदपत्रांची/दस्तऐवजांच्या प्रमाणित नकला व्यवस्थापन समिती सभासदांना देत असते. उपविधी प्रमाणे अशा प्रकरच्या प्रति किंवा नकला देताना व्यवस्थापन समितीने खालीलप्रमाणे फी सभासदांकडून घ्यावी.     

१) संस्थेच्या उपविधी-  मूळ किमंती पेक्षा रु.१०/- जास्त.

२) संस्थेच्या उपविधीतील सुधारणा-  प्रत्येक पानास रु.२/- 

३) संस्थेच्या लेखापरीक्षकांनी तपासलेला मागील ताळेबंद-  प्रत्येक पानास रु.१०

४) संस्थेच्या सभासदत्वासाठी अर्ज-  रु. ५/-

५) संस्थेच्या सभासदाने दिलेली दुसरे व त्यानंतर नाम निर्दशन पत्र-  रु.५/-

६) संस्थेच्या शेअर सर्टिफिकेट/ भागपत्र-  रु. ५०/- 

७) संस्थेच्या सभासदांची यादी-  प्रत्येक पानास रु. ५/- 

८) पत्रव्यवहार( सभासदांशी संबधित )- प्रत्येक पानास  रु. ५/- 

९) संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे किंवा समितीच्या सभेचे इतिवृत्त-  प्रत्येक पानास ५/- 

१०) हानी रक्षण बंधपत्र-  रु. १०/-  

    या व्यतिरिक्त इतर दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रतीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम २७ प्रमाणे शुल्क घ्यावे. 


धन्यवाद!

श्री. सचिन जगताप  

फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


Thursday, 24 June 2021

सहकारी गृहनिर्माण संस्थेने कोणत्या दुरुस्त्या करायला हव्या व सभासदांनी स्वखर्चाने करावयाचा दुरुस्त्या कोणत्या?

 अ) सहकारी गृहनिर्माण संस्थेने करावयाच्या दुरुस्त्या:

उपविधी मध्ये नमूद केलेल्या प्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थेने खालील दुरुस्त्या करणे आवश्यक आहे: 

१) संस्थेमधील सर्व अंतर्गत रस्ते 

२) संस्थेच्या आवाराच्या भिंती 

३) बाहेरील पाण्याची पाईपलाईन

४) पाण्याचे पंप 

५) पाणी साठवणुकीच्या टाक्या

६) सांडपाणी पाईपलाईन , 

७) सेप्टिक टॅंक

८) इमारतीचे जिने 

९) गच्ची व कठड्याच्या भिंती

१०) इमारतीच्या छतांची संरचनात्मक दुरूस्ती 

११) सामाहिक जागेतील दिवे म्हणजे जिन्यातील, अंतर्गत रस्त्यावरील,  क्लब हाउस, जिम, गार्डन इ.

१२) इलेक्ट्रिक लाईन दुरुस्ती सदनिकेच्या मुख्य कनेक्शन पर्यंत.

१३) लिफ्ट 

१४) स्विमिंग पूल

१५) जिम साहित्य

१६) क्लब हाउसची दुरुस्ती

१७) जनरेटर ची दुरुस्ती

१८) सुरक्षा साहित्य उदा. सी.सी.टी.व्ही, इंटर टेलीकॉम, सायरन बेल इ. 

१९) रेन वॉटर हार्व्हेस्टिंग

२०) सोलर सिस्टम 

२१) इमारत / इमारतीच्या बाहेरील भिंती 

२२) सर्व प्रकारची पाण्याची गळती. 

२३) सामाहिक वाहनतळ .


ब) सभासदांनी करावयाच्या दुरुस्त्या:

संस्थेच्या उपविधीत नमूद केल्याप्रमाणे वरील सर्व  बाबी वगळून इतर सर्व प्रकारच्या दुरुस्त्या या सभासदांनी स्वत:च्या खर्चाने कराव्या लागतात.



धन्यवाद!

श्री. सचिन जगताप  

फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


Wednesday, 23 June 2021

व्यवस्थापन समितीचे अधिकार, कर्तव्ये व जबाबदारी कशा प्रकारची असते?

 व्यवस्थापन समितीचे अधिकार, कर्तव्ये व जबाबदारी कशा प्रकारची असते? 


संस्थेच्या उपविधी मधील तरतुदीनुसार  समिती ने आपल्या अधिकारांचा वापर करायला हवा आणि खाली नमूद केल्याप्रमाणे आपले कामकाज व कर्तव्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे.

अ) अधिकार:-

१) संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करणे.

२) सदनिकांची तपासणी केल्यावर सचिवाच्या अहवालानुसार कारवाई करण्याचा अधिकार.

३) आवश्यक असेल्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यसाठी विशेष  सर्वसाधारण सभा बोलाविणे.

४) वार्षिक सर्वसाधारण सभेचा अजेंडा ठरविणे.

५) सहयोगी आणि नाममात्र सद्स्यत्व / सहसदस्यत्व समाप्त झाल्याच्या प्रकरणावर कारवाई करणे.

६) विविध सेवा पुरविणाऱ्या संस्थाकडून कामासाठी आलेल्या कोटेशनवर  चर्चा करून निर्णय घेण्याचा अधिकार समिती सदस्यांना असतो.

७) सभासदांकडून अनामत रक्कम स्वीकारण्यातबाबत तसेच निधी उभारण्या करीता विचार करून ते सर्वसाधारण किंवा विशेष सर्वसाधारण सभेत मांडण्याचा अधिकार समितीला असतो.

८) देखभाल शुल्क ठरविणे तसेच त्यामध्ये वाढ किंवा घट करण्याचा प्रस्ताव/ शिफारस सर्वसाधारण किंवा विशेष सर्वसाधारण सभेला करण्याचा अधिकार समितीला असतो.

९) उपविधीशी सुसंगत अशी अंतर्गत नियमावली बनविणे. 

१०) समितीच्या एखाद्या पदाधिकारी किंवा सदस्याच्या राजीनाम्याचा विचार करणे. 

११) समितीच्या मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे.

१२) मागील समितीकडून कार्यभार स्वीकारताना सर्व कागदपत्र व फाईल ताब्यात घेणे.   



ब) कर्तव्य व जबाबदारी:-

१) सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजामध्ये व्यवस्थापन समितीने त्यांच्या कालावधीमध्ये घेतलेल्या निर्णयांसाठी समिती हि संयुक्तपणे जबाबदार असते.

२) विद्यमान समितीची मुदत संपण्या अगोदर नवीन व्यवस्थापन समिती ची  निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे.

३) प्रत्येक महिन्यात समितीची एक सभा घेतली जाईल याची खातरजमा करणे.

४) विविध कारणासाठी संस्थेकडे आलेल्या अर्जाचा विचार करणे आणि त्यावर कारवाई करणे.

५) सदस्यांकडून संस्थेला येणे असलेली थकबाकी वसूल करण्याच्या कारवाईचा आढावा घेणे.

६) सदस्यांनी मागणी केल्यास संस्थेचे दस्तऐवज उपलब्ध करणे.

७) संस्थेकडे आलेल्या तक्रार अर्जावर व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय घेणे आणि तो निर्णय संबधित सदस्यांना कळविणे.

८) वैधानिक व अंतर्गत लेखापारीक्षांण अहवालातील दुरूस्ती करून दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे आणि ते संबधित खात्यास जमा करणे.

९) सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या जिल्हा फेडरेशन ची मासिक वर्गणी नियमितपणे भरणे.

१०) संस्थेच्या जागेचे आणि इमारतीचे अभिहस्तांतरण करून घेणे.

११) इमारतीचा विमा घेणे.

१२) संस्थेच्या मालमत्तेची योग्य देखभाल करणे.

१३) बँकेतील शिल्लक रक्कमेची योग्य वेळी गुंतवणूक करणे.

१४) समितीवरील रिक्त झालेल्या जागा उपविधीप्रमाणे भरणे.

 


धन्यवाद!

श्री. सचिन जगताप  

फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


Tuesday, 22 June 2021

सहकारी गृहनिर्माण संस्थेतील खजिनदाराची जबाबदारी आणि कार्ये कोणती आहेत?

 सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये अध्यक्ष, सचिव या नंतर महत्वाची जबादारी असते ती खजिनदार यांची असते, खजिनदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने खालील जबाबदारी तसेच कार्ये पार पाडणे आवश्यक आहे:

१) दरमहा / तिमाही देखभाल शुल्क व इतर शुल्क बिल तयार करणे व सभासदांना  पाठविणे.

२) सभासद किंवा सभासद व्यतिरिक्त व्यक्तीकडून येणारी रक्कम स्वीकारणे व त्यांना पावती देणे.

३) देखभाल शुल्क व इतर शुल्क यांची नोंदवही/ रजिस्टर अद्ययावत ठेवणे.

४) दरमहा / तिमाही सभासदांची थकबाकी यादी तयार करणे.

५) संस्थेला वेगवेगळ्या प्रकारची सेवा पुरविणाऱ्या संस्थांचे बिल घेऊन चेक तयार करणे, पेमेंट व्हाउचर बनविणे.

६) रोकड संभाळणे तसेच  रोकड रजिस्टर आणि बँकेची रजिस्टर अद्ययावत ठेवणे.

७) खर्चाची फाईल इतर पदाधिकारी यांची मान्यता घेऊन अद्ययावत ठेवणे.

८) विविध कामांसाठी कोटेशन मागविणे.

९) चेक जमा करून रजिस्टर अद्ययावत ठेवणे तसेच सदर चेक बँकेत जमा करणे.

१०) सर्व आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवणे.

११) मासिक सभेत आवश्यक पत्रक सादर करणे उदा. मागील महिन्यातील सर्व जमा आणि खर्च.

१२) वार्षिक सभे पूर्वी लेखापारीक्षांसाठी आवश्यक सर्व बाबींच्या पूर्तता करणे.

१३) वेळेत लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल निबंधक व लेखापरीक्षण विभागास जमा करून पोहच घेणे.

१४) वार्षिक सर्वसाधारण सभेत हिशोबपत्रके व लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून त्यास मान्यता घेणे.

छोट्या गृहनिर्माण संस्थेत खजिनदार स्वतः वरील सर्व जबाबदारी व कार्य पार पडतो, मोठ्या गृहनिर्माण संस्थेत मध्ये त्यांच्या मदती साठी लेखापाल/ लिपिक यांची नियुक्ती करून त्यांच्याकडून कार्य करून घेतले जाते. परंतु अशा सर्व परिस्थितीत खजिनदार आणि इतर पदाधिकारी सयुंक्त रित्या जबाबदार असतात. 

धन्यवाद!

श्री. सचिन जगताप  

फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


Monday, 21 June 2021

सभासदाचे हक्क अथवा अधिकार कोणते आहेत? तसेच जबाबदारी कोणती आहे?

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदास खालील अधिकार / हक्क सभासदत्व मिळाल्यावर प्राप्त होतात:

१. सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचा अधिकार प्राप्त होतो.

२. थकबाकीदार नसल्यास संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या निवडणुकीस उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा अधिकार आहे.

३. कायद्यातील कलम ३२(१) नुसार सभासदास सबंधित हिशोब पत्रके व कलम ३२(२) मध्ये नमुद इतर कागदपत्राचे निरीक्षण करण्याचा व त्याच्या प्रती मिळविण्याचा हक्क प्राप्त होतो.  

४. संस्त्यांथेच्च्याया उपविधीप्रमाणे सदनिकेचा ताबा व  उपभोग घेण्याचा हक्क प्राप्त होतो.

५. सहसभासद / नाममात्र सभासद करण्याचा अधिकार प्राप्त होतो.

६. उपविधी / पोटनियमांची प्रत मिळविण्याचा हक्क सभासदास मिळतो .

७. वारस नोंद करण्याचा अधिकार

८. सदनिका हस्तांतरित करताना ना हरकत दाखला मिळण्याचा अधिकार.  

९. संस्थेच्या निवडणुकीस मतदान करण्याचा हक्क प्राप्त होतो.

१०. शेअर सर्टिफिकेट / भाग दाखला मिळण्याचा अधिकार असतो.

११. दिलेल्या रकमांच्या पावत्या मिळण्याचा अधिकार.


सभासदाची जबाबदारी किंवा कर्तव्य पुढीलप्रमाणे:

१) संस्थेच्या उपविधीचे पालन करणे

२) देखभाल शुल्क व इतर शुल्क वेळेत जमा करणे

३) संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण, विशेष सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणे

४) संस्थेच्या नियमांचे पालन करणे, संस्थेच्या हितास बाधा होईल असे कृत्य न करणे.

५)  सभेत नियमांचे पालन करणे

६) सदनिकेची देखभाल व्यवस्थित करणे.

७) इतर सभासदांना त्रास होईल असे कृत्य टाळणे.

८) सदनिका हस्तातरण करण्यापूर्वी संस्थेला किमान १५ दिवस अगोदर पत्राद्वारे कळविणे आवश्यक आहे.

९) सदनिका किंवा गाळा गहाण ठेवण्या अगोदर संस्थेची पूर्व परवानगी घेणे.


धन्यवाद!

श्री. सचिन जगताप

फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८



सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्षांचे अधिकार कोणते ? तसेच अध्याक्ष्याची जबाबदारी आणि कार्य कोणती?

  सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये अध्यक्ष पद हे खूप मात्वाचा पदाधिकारी म्हणून काम पहात असतात. अध्यक्षांची नेमणूक हि पाच वर्षासाठी केली जाते.  तत्पूर्वी अध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा असल्यास ते सचिवांकडे राजीनामा देऊ शकतात. अध्यक्षांचे अधिकार तसेच त्यांच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या आपण पुढे पाहणार आहोत.

अध्यक्षांचे अधिकार:- 

१) संस्थेचे उपविधी यातील तरतुदीच्या कक्षेत राहून संस्थेच्या अध्यक्षास सर्वांगिन देकरेख व नियंत्रण ठेवणे

२) मार्गदर्शन करण्याणे

३) आकस्मिक अडचण्यीच्या वेळी संस्थेच्या अध्यक्षांना समितीचे कोणतेही अधिकार वापरु शकतात. असे अधिकार वापरून घेतलेल्या  निर्णय व त्यामागील कारणे लेखी स्वरुपात मांडणे आवश्यक आहे. संस्थेच्या अद्याक्षाने अशा तऱ्हेने अधिकार वापर करून घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर समितीच्या पुढील सभेत मान्य करून घ्यावे लागतात.

४) एखादा ठराव करताना दोन्ही बाजूस समान मत पडल्यास अंतिम म्हणजेच निर्णायकमत देण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो.

५) बँक खाते चालविण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो.

६) संस्थेच्या देय रक्कमा अध्यक्षांच्या सहीने देण्याचा अधिकार असतो

७) व्यवस्थापन समितीची सभा बोलाविण्या करिता सचिवांना सूचना करू शकतात.

८) संस्थेची हिशोबपत्रकांवर सही करणे.

९) सभासदांच्या ताक्ररींवर न्याय देणे.

अध्याक्ष्याची जवाबदारी आणि कार्य:-

१ ) व्यस्थापन समितीद्वारे गैर व्यवहार होऊ नये यासाठी अध्यक्ष हे जबाबदार असतो.

२) वेळेत लेखापारीक्ष्ण करून घेणे

३) वेळेत वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविणे व पार पाडणे.

४) लेखापरीक्षण अहवाला मधील दोष दुरुस्ती करून घेण्याचे व ओ फॉर्म जमा करणे.

५) एखाद्या आवश्यक बाबींसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविणे.

६) संस्थेच्या दप्तरी नोंदी करून घेणे.

७) संस्थेचे कामकाज उपविधीच्या चौकटीत राहून सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्षांची असते.

धन्यवाद!


श्री सचिन जगताप

९८२३३६९९०१/९७३०५७५८६८


Thursday, 17 June 2021

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाची कामे अथवा जबाबदारी?

सहकारी गृहनिर्माण संस्थे मधील सचिव/ सेक्रेटरी हे पद खूप महत्वाचे आहे, संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सचिवांना वेगवेगळी कामे पार पडावी लागतात, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या उपविधी क्रमांक १४१ अन्वये संस्थेच्या सचिवाची महत्वाची कामे खालील प्रमाणे असतात.

  • ठराविक मुदतीत व विहित पद्धतीने सभासदाना शेअर सर्टिफिकेट / भाग दाखले  देणे.
  • हंगामी अथवा नव्याने स्थापन झालेल्या समितीची पहिली सभा बोलाविणे.
  • समितीच्या सर्व सभांच्या तसेच वार्षिक आणि विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस तयार करून पाठविणे.
  • समितीच्या सर्व सभांच्या तसेच वार्षिक आणि विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहिणे. 
  • संस्थेच्या मालमत्तेची पाहणी करणे.
  • लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्ती करून "ओ" फॉर्म जमा करणे 
  • थकीत मासिक वर्गणी अथवा इतर थकबाकी बाबत संबधित सभासदांना स्मरण पत्र पाठविणे.
  • सभासद सहयोगी सभासद व नाममात्र सभासद यांच्या राजिनाम्याबाबत कार्यवाही करणे.
  • नामनिर्देशन केलेले किंवा ते रद्द केलेल्या अर्जाची नोंद घेऊन नामनिर्देशन रजिस्टर मध्ये  नोंद ठेवणे.
  • सभासदांकडून येणाऱ्या तक्रारीची नोंद घेऊन त्यावर समितीच्या सभेत चर्चा करून निर्णय घेणे व योग्य टी पुढील कार्यवाही करणे.
  • सभासदांकडून येणाऱ्या विविध अर्जांवर योग्य टी कार्यवाही करणे.
  • उपविधी प्रमाणे आवश्यक सर्व रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 
  • जर  उपविधीतील तरतुदीचे उल्लंघन सभासदाने केले तर समितीने दिलेल्या सूचनेनुसार सबंधित सभासदाला कळविणे व त्याच्यावर योग्य टी कारवाई करणे. 
 वरील सर्व कामे तसेच वेळोवेळी इतर कामे करणे गरजेचे आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थेतील विविध प्रकारच्या समस्या- त्यावरील उपाय योजना तसेच वेगवेगळ्या  कामांबाबत योग्य माहिती साठी आमच्या सोबत या व तुमच्या जवळील व्यक्तींना याबाबत प्रबोधन करूयात.
धन्यवाद!

श्री. सचिन जगताप
मो.नं.९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
Email: gd.casachinjagtap@gmail.com 

संस्थेच्या जागेचे व बिल्डींगचे अभिहस्तांतरण पूर्ण न होण्याची किंवा अडथळा निर्माण करणारी कारणे कोणती ? (Reason behind Pending Conveyance of Land & Building of the society.)

अ) जमीन मालक/बिल्डर यांचे असहकार्य (Due to Land Owner/ Builder):- १) विक्री न झालेल्या सदनिका (Pending sale of Flats / Shops) २) एफ. एस. आय....