सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये अध्यक्ष पद हे खूप मात्वाचा पदाधिकारी म्हणून काम पहात असतात. अध्यक्षांची नेमणूक हि पाच वर्षासाठी केली जाते. तत्पूर्वी अध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा असल्यास ते सचिवांकडे राजीनामा देऊ शकतात. अध्यक्षांचे अधिकार तसेच त्यांच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या आपण पुढे पाहणार आहोत.
अध्यक्षांचे अधिकार:-
१) संस्थेचे उपविधी यातील तरतुदीच्या कक्षेत राहून संस्थेच्या अध्यक्षास सर्वांगिन देकरेख व नियंत्रण ठेवणे
२) मार्गदर्शन करण्याणे
३) आकस्मिक अडचण्यीच्या वेळी संस्थेच्या अध्यक्षांना समितीचे कोणतेही अधिकार वापरु शकतात. असे अधिकार वापरून घेतलेल्या निर्णय व त्यामागील कारणे लेखी स्वरुपात मांडणे आवश्यक आहे. संस्थेच्या अद्याक्षाने अशा तऱ्हेने अधिकार वापर करून घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर समितीच्या पुढील सभेत मान्य करून घ्यावे लागतात.
४) एखादा ठराव करताना दोन्ही बाजूस समान मत पडल्यास अंतिम म्हणजेच निर्णायकमत देण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो.
५) बँक खाते चालविण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो.
६) संस्थेच्या देय रक्कमा अध्यक्षांच्या सहीने देण्याचा अधिकार असतो
७) व्यवस्थापन समितीची सभा बोलाविण्या करिता सचिवांना सूचना करू शकतात.
८) संस्थेची हिशोबपत्रकांवर सही करणे.
९) सभासदांच्या ताक्ररींवर न्याय देणे.
अध्याक्ष्याची जवाबदारी आणि कार्य:-
१ ) व्यस्थापन समितीद्वारे गैर व्यवहार होऊ नये यासाठी अध्यक्ष हे जबाबदार असतो.
२) वेळेत लेखापारीक्ष्ण करून घेणे
३) वेळेत वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविणे व पार पाडणे.
४) लेखापरीक्षण अहवाला मधील दोष दुरुस्ती करून घेण्याचे व ओ फॉर्म जमा करणे.
५) एखाद्या आवश्यक बाबींसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविणे.
६) संस्थेच्या दप्तरी नोंदी करून घेणे.
७) संस्थेचे कामकाज उपविधीच्या चौकटीत राहून सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्षांची असते.
धन्यवाद!
श्री सचिन जगताप
९८२३३६९९०१/९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment