सहकारी गृहनिर्माण संस्थे मधील सचिव/ सेक्रेटरी हे पद खूप महत्वाचे आहे, संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सचिवांना वेगवेगळी कामे पार पडावी लागतात, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या उपविधी क्रमांक १४१ अन्वये संस्थेच्या सचिवाची महत्वाची कामे खालील प्रमाणे असतात.
- ठराविक मुदतीत व विहित पद्धतीने सभासदाना शेअर सर्टिफिकेट / भाग दाखले देणे.
- हंगामी अथवा नव्याने स्थापन झालेल्या समितीची पहिली सभा बोलाविणे.
- समितीच्या सर्व सभांच्या तसेच वार्षिक आणि विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस तयार करून पाठविणे.
- समितीच्या सर्व सभांच्या तसेच वार्षिक आणि विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहिणे.
- संस्थेच्या मालमत्तेची पाहणी करणे.
- लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्ती करून "ओ" फॉर्म जमा करणे
- थकीत मासिक वर्गणी अथवा इतर थकबाकी बाबत संबधित सभासदांना स्मरण पत्र पाठविणे.
- सभासद सहयोगी सभासद व नाममात्र सभासद यांच्या राजिनाम्याबाबत कार्यवाही करणे.
- नामनिर्देशन केलेले किंवा ते रद्द केलेल्या अर्जाची नोंद घेऊन नामनिर्देशन रजिस्टर मध्ये नोंद ठेवणे.
- सभासदांकडून येणाऱ्या तक्रारीची नोंद घेऊन त्यावर समितीच्या सभेत चर्चा करून निर्णय घेणे व योग्य टी पुढील कार्यवाही करणे.
- सभासदांकडून येणाऱ्या विविध अर्जांवर योग्य टी कार्यवाही करणे.
- उपविधी प्रमाणे आवश्यक सर्व रजिस्टर अद्ययावत ठेवणे.
- जर उपविधीतील तरतुदीचे उल्लंघन सभासदाने केले तर समितीने दिलेल्या सूचनेनुसार सबंधित सभासदाला कळविणे व त्याच्यावर योग्य टी कारवाई करणे.
वरील सर्व कामे तसेच वेळोवेळी इतर कामे करणे गरजेचे आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थेतील विविध प्रकारच्या समस्या- त्यावरील उपाय योजना तसेच वेगवेगळ्या कामांबाबत योग्य माहिती साठी आमच्या सोबत या व तुमच्या जवळील व्यक्तींना याबाबत प्रबोधन करूयात.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
मो.नं.९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
Email: gd.casachinjagtap@gmail.com
No comments:
Post a Comment