उत्तर :- बऱ्याचवेळा संस्थेतील सभासद व्यवस्थापन समितीकडे वेगवेगळ्या कागदपत्रांची/दस्तऐवजांची मागणी करतात. सदर कागदपत्रांची/दस्तऐवजांच्या प्रमाणित नकला व्यवस्थापन समिती सभासदांना देत असते. उपविधी प्रमाणे अशा प्रकरच्या प्रति किंवा नकला देताना व्यवस्थापन समितीने खालीलप्रमाणे फी सभासदांकडून घ्यावी.
१) संस्थेच्या उपविधी- मूळ किमंती पेक्षा रु.१०/- जास्त.
२) संस्थेच्या उपविधीतील सुधारणा- प्रत्येक पानास रु.२/-
३) संस्थेच्या लेखापरीक्षकांनी तपासलेला मागील ताळेबंद- प्रत्येक पानास रु.१०
४) संस्थेच्या सभासदत्वासाठी अर्ज- रु. ५/-
५) संस्थेच्या सभासदाने दिलेली दुसरे व त्यानंतर नाम निर्दशन पत्र- रु.५/-
६) संस्थेच्या शेअर सर्टिफिकेट/ भागपत्र- रु. ५०/-
७) संस्थेच्या सभासदांची यादी- प्रत्येक पानास रु. ५/-
८) पत्रव्यवहार( सभासदांशी संबधित )- प्रत्येक पानास रु. ५/-
९) संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे किंवा समितीच्या सभेचे इतिवृत्त- प्रत्येक पानास ५/-
१०) हानी रक्षण बंधपत्र- रु. १०/-
या व्यतिरिक्त इतर दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रतीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम २७ प्रमाणे शुल्क घ्यावे.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment