व्यवस्थापन समितीचे अधिकार, कर्तव्ये व जबाबदारी कशा प्रकारची असते?
संस्थेच्या उपविधी मधील तरतुदीनुसार समिती ने आपल्या अधिकारांचा वापर करायला हवा आणि खाली नमूद केल्याप्रमाणे आपले कामकाज व कर्तव्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे.
अ) अधिकार:-
१) संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करणे.
२) सदनिकांची तपासणी केल्यावर सचिवाच्या अहवालानुसार कारवाई करण्याचा अधिकार.
३) आवश्यक असेल्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविणे.
४) वार्षिक सर्वसाधारण सभेचा अजेंडा ठरविणे.
५) सहयोगी आणि नाममात्र सद्स्यत्व / सहसदस्यत्व समाप्त झाल्याच्या प्रकरणावर कारवाई करणे.
६) विविध सेवा पुरविणाऱ्या संस्थाकडून कामासाठी आलेल्या कोटेशनवर चर्चा करून निर्णय घेण्याचा अधिकार समिती सदस्यांना असतो.
७) सभासदांकडून अनामत रक्कम स्वीकारण्यातबाबत तसेच निधी उभारण्या करीता विचार करून ते सर्वसाधारण किंवा विशेष सर्वसाधारण सभेत मांडण्याचा अधिकार समितीला असतो.
८) देखभाल शुल्क ठरविणे तसेच त्यामध्ये वाढ किंवा घट करण्याचा प्रस्ताव/ शिफारस सर्वसाधारण किंवा विशेष सर्वसाधारण सभेला करण्याचा अधिकार समितीला असतो.
९) उपविधीशी सुसंगत अशी अंतर्गत नियमावली बनविणे.
१०) समितीच्या एखाद्या पदाधिकारी किंवा सदस्याच्या राजीनाम्याचा विचार करणे.
११) समितीच्या मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे.
१२) मागील समितीकडून कार्यभार स्वीकारताना सर्व कागदपत्र व फाईल ताब्यात घेणे.
ब) कर्तव्य व जबाबदारी:-
१) सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजामध्ये व्यवस्थापन समितीने त्यांच्या कालावधीमध्ये घेतलेल्या निर्णयांसाठी समिती हि संयुक्तपणे जबाबदार असते.
२) विद्यमान समितीची मुदत संपण्या अगोदर नवीन व्यवस्थापन समिती ची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे.
३) प्रत्येक महिन्यात समितीची एक सभा घेतली जाईल याची खातरजमा करणे.
४) विविध कारणासाठी संस्थेकडे आलेल्या अर्जाचा विचार करणे आणि त्यावर कारवाई करणे.
५) सदस्यांकडून संस्थेला येणे असलेली थकबाकी वसूल करण्याच्या कारवाईचा आढावा घेणे.
६) सदस्यांनी मागणी केल्यास संस्थेचे दस्तऐवज उपलब्ध करणे.
७) संस्थेकडे आलेल्या तक्रार अर्जावर व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय घेणे आणि तो निर्णय संबधित सदस्यांना कळविणे.
८) वैधानिक व अंतर्गत लेखापारीक्षांण अहवालातील दुरूस्ती करून दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे आणि ते संबधित खात्यास जमा करणे.
९) सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या जिल्हा फेडरेशन ची मासिक वर्गणी नियमितपणे भरणे.
१०) संस्थेच्या जागेचे आणि इमारतीचे अभिहस्तांतरण करून घेणे.
११) इमारतीचा विमा घेणे.
१२) संस्थेच्या मालमत्तेची योग्य देखभाल करणे.
१३) बँकेतील शिल्लक रक्कमेची योग्य वेळी गुंतवणूक करणे.
१४) समितीवरील रिक्त झालेल्या जागा उपविधीप्रमाणे भरणे.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment