अभिहस्तांतरण:- इमारत आणि जमीन यांचे नोंदणीकृत दस्ताद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा इतर वैधानिक संस्थेच्या नावे हस्तांतरण करणे म्हणजे अभिहस्तांतरण होय.
सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा इतर वैधानिक संस्थेची नोंदणी पूर्ण झाल्यावर चार (४) महिन्याच्या आत बिल्डर प्रमोटर्स यांनी इमारत व जागेचे हस्तांतरण करून देणे बंधनकारक आहे. परंतु बऱ्याचवेळा याचे पालन केले जात नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने मालकी हक्क अधिनियम १९६३ (MOFA) मध्ये सुधारणा केल्या व मानीव अभिहस्तांतरण हि प्रक्रिया समाविष्ट करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना अभिहस्तांतरण करण्याचे आदेश देण्याचा अधिकार दिला गेला. या प्रक्रियेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे सक्षम अधिकारी/ प्राधिकृत अधिकारी म्हणून संस्थेची व बिल्डर प्रमोटर्स, जागा मालक यांची बाजू ऐकून घेतात आणि त्यांचा आदेश देतात.
अ) नियमित अभिहस्तांतरण ( Conveyance Deed): सध्या शब्दांमध्ये सांगायचं झाल तर जेंव्हा बिल्डर प्रमोटर्स/ विकासक व जमीन मालक स्वतः जागा व इमारतीचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करून देण्यास तयार होतात व टी प्रक्रिया पूर्ण करतात त्यास नियमित अभिहस्तांतरण ( Conveyance Deed) असे म्हणतात. या प्रक्रीये मध्ये बिल्डर प्रमोटर्स व जमीन मालक स्वतः अभिहस्तांतरणचा दस्त ऐवज तयार करतात व दुय्यम निबंधक नोंदणी अधिकारी यांच्या समोर सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतात.
ब) मानीव अभिहस्तांतरण ( Deemed Conveyance): जेंव्हा बिल्डर प्रमोटर्स/ विकासक व जमीन मालक स्वतः जागा व इमारतीचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करून देण्यास तयार नसतात किंवा काही आटी टाकून हस्तातरण करण्यास तयार होतात पण अशा आटी संस्थेस मान्य नसतात अशा परीस्थित संस्था प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर मानीव अभिहस्तांतरणाचा अर्ज दाखल करते, आपली बाजू मांडते. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित प्राधिकृत अधिकारी अभिहस्तांतरण संबंधी योग्य ते आदेश पारित करतो. अभिहस्तांतरण करण्याचा आदेश पारित झाल्यानंतर दस्तावर सही करून नोंदणी आणि अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी नेमला जातो. या प्रक्रियेद्वारे जागा व इमारतीचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करून घेणे म्हणजे मानीव अभिहस्तांतरण होय.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment