प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेची ३० सप्टेंबर पूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. सध्या कोविड परिस्थिती मुळे सरकारने सन २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी काही वेगळी नियमावली दिली आहे तसेच वेळ वाढून दिला आहे. या सभेची नोटीस हि पूर्ण १४ दिवसांची असावी. दोन वार्षिक सर्वसाधारण सभेमधील कालावधीत घेतल्या जाणाऱ्या सभेस विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्वाच्या विषयांवर चर्चा करणे तसेच त्यावर ठराव करून निर्णय घेणे आवश्यक असते. सदर महत्वाचे विषय पुढीलप्रमाणे.
१) मागील वार्षिक / विशे सर्वाधारण सभेचे इत्तीवृत वाचून कायम करणे.
२) संस्थेची आर्थिक पत्रके सदर करून त्यांना मान्यता घेणे.
३) लेखापरीक्षण अहवालाचे व त्यातील शेरे यांचे वाचन करून त्याबद्दल दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे.
४) पुढील आर्थिक वर्षासाठी तालीकेवरील लेखापरीक्षकाची नेमणूक करणे.
५) पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभेत मांडून त्यास मान्यता देणे.
६) मासिक वर्गणी वाढविणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेणे.
७) इमारतीचे व जागेचे मालकी हक्क हस्थांतरित करण्याचा ठराव करणे व त्यासाठी दोन व्यक्तीस सहीचे
अधिकार देणे.
८) सुधारित उपविधीला मंजुरी देणे.
९) सर्वसाधारण सभेच्या कक्षेत येणारा खर्च त्यावर चर्चा करून निर्णय घेणे.
१०) सभेपूर्वी सभासदाकडून आलेल्या लेखी सूचना व ऐनवेळी इतर महत्वाचे विषय अध्यक्षांच्या परवानगीने
घेऊ शकतात.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फोन नंबर: ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment