सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तीन महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक असते. हि सभा संस्थेचे मुख्यप्रवर्तकयांनी बोलवावी, तीन महिन्यात सदर सभा न घेतल्यास त्यानंतर हि सभा घेण्याचे अधिकार निबंधक कार्यालयास असतात. या सभेची नोटीस हि पूर्ण १४ दिवसांची असावी. पहिल्या सर्वसाधारण सभेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक असते. सदर महत्वाचे विषय पुढीलप्रमाणे.
१) संस्था नोंदणी नंतर ज्या सदनिका /गाळेधारक यांनी सभासदत्वासाठी केलेल्या अर्ज लक्षात घेऊन त्यांना सभासद करून घेणे.
२) संस्था नोंदणी पूर्वी झालेल्या खर्चाच्या विवरण पत्रास मान्यता देणे.
३) संस्थेची हंगामी समितीची नेमणूक करणे व अधिकार सुपूर्त करणे.
४) जिल्हा फेडरेशन चे सभासद होणे.
५) लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे.
६) इमारतीचे व जागेचे मालकी हक्क हस्थांतरित करण्याचा ठराव करणे.
७) संस्थेचे बँक खाते उघडण्याचा ठराव करून भाग व प्रवेश फी ची रक्कम मुख्याप्रवर्तक यांच्या खात्यावरून संस्थेच्या खात्यात वर्ग करणे.
८) उपविधीला मंजुरी देणे.
९) संस्थेची मासिक वर्गणी ठरविणे.
१०) ऐनवेळी इतर महत्वाचे विषय अध्यक्षांच्या परवानगीने घेऊ शकतात.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फोन नंबर: ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment