महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० चे कलम १५४ ब २९ मधील तरतुदीस अनुसार संस्थेच्या सभासदा कडून येणे बाकी / थकीत रक्कम वसूल करण्याची तसचे वसुली दाखला मिळणेबाबत कागदपत्रे व कार्यपद्धती विहित केलेली आहे . थोडक्यात ती खालीलप्रमाणे आहे.
१) सहकारी संस्थेने ज्या सभासदांची रक्कम थकीत आहे त्यांना सभासदांना १५ दिवस मुदतीचे ३ स्मरण पत्र पाठवावे.
२) सहकारी संस्थेने सभासदांकडील येणे बाकी संदर्भात व्यवस्थापन सभेत ठराव पास करून घ्यावा.
३) सहकारी संस्थेने वसुली दाखला प्राप्त करण्या साठी अर्ज करण्यापूर्वी थकीत रक्कम भरण्यासाठी संबधित सभासदांना १५ दिवस मुदतीची अतिंम नोटीस द्यावी.
४) अतिंम नोटीस ची मुदत संपल्यानंतर संस्थेने उपनिबंधक/ सहाय्यक निबंधक सहकरी संस्था यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावा.
५) उपनिबंधक/ सहाय्यक निबंधक सहकरी संस्था अर्ज व कागदपत्र यांची छाननी करून संबधित सभासद व संस्थेस यांना नोटीस काढतील.
६) दोघांचे हि म्हणणे व ऐकून घेऊन उपनिबंधक/ सहाय्यक निबंधक सहकरी संस्था आपला आदेश पारित करितील/ वसुली दाखला देतील.
७) संस्थेने त्या दाखल्यास अनुसरून पुढील कार्यवाही करावी.
अर्जा सोबत खालील कागदपत्र जोडावीत.
अर्जाच्या ४ प्रती.
मासिक वर्गणी व इतर शुल्काबाबत (सर्वसाधारण / व्यवस्थापन समिती सभेतील) झालेल्या ठरावाची नकल.
व्याज आकारण्याबाबत (सर्वसाधारण / व्यवस्थापन समिती सभेतील) झालेल्या ठरावाची नकल.
सुनवणी साठी हजर राहणाऱ्या व्यक्तीचे अधिकार पत्र.
सभासदाच्या खतावणीचा उतारा व पाठविलेल्या बिलांची प्रत.
सभासदांना पाठविलेले स्मरण पत्र.
सभासदांना पाठविलेले अंतिम नोटीस.
सभासदास उपनिबंधक कार्यालयाने दिलेली नोटीस रजिस्टर पोस्ट ने पाठलेली व मिळालेली पोहच.
चौकशी फी शासकीय कोषागारात भरल्याचे चलन.
आवश्यक अर्ज, ठराव तसेच स्मरण पत्र किंवा अंतिम नोटीस यांच्या नमुना फॉर्म साठी संपर्क करू शकता.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
(फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८)
No comments:
Post a Comment