सामान्यतः मासिक वर्गणी गोळा करणे व त्या रक्कमेतून खर्च करून संस्थेची देखभाल करणे हि व्यवस्थापन समितीची जबादारी असते.
सदर वर्गणी वेळेत जमा करणे हि प्रत्येक सभासद तसेच सदनिका/ गाळेधारक यांची असते.
मासिक वर्गणी चे बिल सचिवांनी सभासदांना पाठविणे आवश्यक आहे.
मासिक वर्गणीची विगतवारी बिलामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
सदर विगतवारी हि उपविधीप्रमाणे असणे आवश्यक आहे.
दिलेल्या पैशांची / मासिक वर्गणीची पावती देणे आवश्यक आहे.
ज्या सदनिकेत/ गळ्यामध्ये भाडेकरू त्याचा वापर करत असेल त्या सभासदांना १० % नॉन ऑक्यूपन्सी चार्जेस देणे आवश्यक आहे.
दिलेल्या कालावधी मध्ये जे सभासद वर्गणी जमा केली नाही त्यांना दंड / व्याज आकारावे.
जे सभासद आगाऊ वर्गणी जम करतील ( सहा महिने/ बारा महिने ) अशा सभासदांना काही शी सूट दिली जाते ती उपविधी व सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार असावी.
जे सभासद वेळेत वर्गणी जमा केली नाही त्यांना सचिवांनी तीन स्मरण पत्र पाठविणे आवश्यक आहे.
स्मरण पत्र पाठवून सुद्धा जे सभासद वर्गणी जमा करत नाही त्यांची विहित नमुन्यात तक्रार उपनिबंधक कार्यलयात करून वसुली दाखला/ आदेश मिळविणे.
उपनिबंधक कार्यलयाकडून मिळालेल्या वसुली दाखला/ आदेश ची अंमलबजावणी करणे.
सदनिकाधारक किंवा गाळे धारक संबधित गळ्याचा वापर करत असो किंवा नसो त्याने मासिक वर्गणी देणे बंधनकारक आहे.
बऱ्याच वेळा तळ मजल्यातील सभासद यांचे म्हणणे असते की आम्ही लिफ्ट चा वापर करत नाही त्यामुळे त्या संबधी वर्गणी आम्ही देणार नाही, पण हे म्हणणे उपविधीप्रमाणे प्रमाणे अयोग्य आहे. सर्व सभासदांना तो समप्रमाणात द्यावा लागेल.
ज्या सभासदांची मासिक वर्गणी थकलेली आहे त्यांना व्यवस्थापन समिती वर सदस्य अथवा पदासाठी अर्ज भरता येत नाही.
ज्या सभासदांची मासिक वर्गणी थकलेली आहे त्यांना मतदानाचा हक्क नसतो.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
(फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८)
No comments:
Post a Comment