मासिक वर्गणी तसेच वेगवेगळा निधी सभासदांकडून जमा करताना व्यवस्थापन समितीने त्याचे बिल सभासदांना पाठविणे गरजेचे आहे. मासिक वर्गणी / निधी काही ठिकाणी सम प्रमाणांत तर काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विगतवारी करून जमा जातो. सदर निधी बाबत सभासदांच्या बऱ्याच शंका असल्याच्या आपणस दिसून येतात. या अगोदर आपण मासिक वर्गणी मध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो तसेच सेवा खर्चा मध्ये कोणत्या बाबी समाविष्ट होतात याबदल पहिले. आज आपण मासिक वर्गणी / निधी ची विगतवारी कशी केली पाहिजे हे पाहणार आहोत. उपविधी क्रमांक ६७) अ) नुसार समिती मासिक वर्गणी / निधी खालीलप्रमाणे घेईल:
अ.क्र. | तशील | विगतवारी |
१ | सेवा शुल्क ( Service Charge) | सर्व सदनिका/गाळेधारकांना समान प्रामाणात |
२ | पाणीपट्टी ( Water Charges) | सदनिकेमधील नळांच्या आकारांच्या आणि एकूण संख्येच्या प्रमाणात |
३ | संस्थेच्या इमारतीच्या / इमारतीच्या देखभालीचा व दुरुस्तीचा खर्च ( Building Repair & Maintenance) | दर साल बांधकाम खर्चाच्या ०.७५% किमान किंवा व्यवस्थापन समितीने वेळोवेळी केलेल्या ठरावा प्रमाणे. |
४ | सिंकींग फंड ( Sinking Fund) | दर साल बांधकाम खर्चाच्या ०.२५% किमान |
५ | शिक्षण आणि प्रशिक्षण निधी ( Education & Training Fund) | सर्व सदनिका/गाळेधारकांना रु.१० दर महा |
६ | लिफ्टच्या देखभालीचा व दुरुस्तीचा आणि चालविण्याचा खर्च ( Lift Repair & Maintenance) | ज्या इमार्तीमाध्ये लिफ्ट आहे अशा सर्व सदनिका/गाळेधारकांना समान प्रामाणात |
७ | अकृषी कर (N.A. Tax) | सदनिकेच्या बांधकाम क्षेत्राच्या प्रमाणात |
८ | वाहन जागा आकार ( Parking Charges) | सर्वसाधारण सभा मध्ये झालेल्या ठरवा प्रमाणे. |
९ | विमा हप्ता ( Building Insurance) | सदनिकेच्या बांधकाम क्षेत्राच्या प्रमाणात |
१० | निवडणूक निधी ( Election Fund) | सर्व सदनिका/गाळेधारकांना समान प्रामाणात |
११ | भाडेपट्टी / लीज रेंट ( lease Rent) | सदनिकेच्या बांधकाम क्षेत्राच्या प्रमाणात |
१२ | भोगवटेतर शुल्क ( Non Occupancy Charges) | ज्या सदनिका अथवा गाळे भाड्याने आहेत त्यांच्याकडून १० % जास्त |
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
(फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८)
No comments:
Post a Comment