Friday, 2 July 2021

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आकारामध्ये/ मासिक वर्गणीमध्ये कोण कोणत्या बाबींचा समाविष्ट असू शकतात?

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महत्वाच्या उद्देशा पैंकी एक म्हणजेच संस्थेच्या सामायिक जागेची, मालमत्तेची तसेच इमारतीची देखभाल करणे होय. हि देखभाल योग्य व नियमितपणे होण्यासाठी आवश्यकता असते ती पैशाची. म्हणूनच वेळेत मासिक वर्गणी जमा करणे हि संस्थेच्या सर्व सभासदांची जबाबदारी असते. संस्थेच्या उपविधी मध्ये “आकार” म्हणून निर्दिष्ट केलेला संस्थेचा खर्च व तिचा निधी उभारण्यासाठी सदस्यांकडून गोळा  करावयाची वर्गणी यामध्ये खालील बाबीचा समावेश असतो: 

१) मालमत्ता कर ( Common Property Tax)

२) पाणीपट्टी ( Water Charges )

३) सामाईक वीज आकार ( Common Electricity Charges )

४) दुरुस्ती व देखभाल निधीतील  ( Repairs & Maintenance Fund )

५) संस्थेच्या लिफ्टची देखभाल व दुरुस्ती खर्च ( Lift Repair & Maintenance Expenses)

६) सिंकिग फंड ( Sinking Fund )

७) सेवा आकार ( Service Charge)

८) पार्किग चार्जेस ( वाहन उभे करण्याच्या जागेचे भाडे ) ( Parking Charges) 

९) थकविलेल्या पैशावरील व्याज ( Interest on Default Payment )

१०) कर्जाच्या ह्फ्त्याची परतफेड व व्याज ( Loan Installment & Interest )

११) भोगवटेतर  शुल्क ( Non Occupancy Charges)

१२) विमा हप्ता ( Building Insurance)

१३) भाडेपट्टी भाडे ( Lease Rent)

१४) अकृषी कर ( N.A. Tax)

१५) शिक्षण व प्रशिक्षण निधी (Education & Training Fund )

१६) निवडणूक निधी ( Election Fund )

१७) सर्वसाधारण किंवा विशेष सर्वसाधारण सभेत ठराव करून कोणतेही अन्य आकार ( Any other approved by AGM/SGM )

धन्यवाद!

श्री. सचिन जगताप  

फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


No comments:

Post a Comment

संस्थेच्या जागेचे व बिल्डींगचे अभिहस्तांतरण पूर्ण न होण्याची किंवा अडथळा निर्माण करणारी कारणे कोणती ? (Reason behind Pending Conveyance of Land & Building of the society.)

अ) जमीन मालक/बिल्डर यांचे असहकार्य (Due to Land Owner/ Builder):- १) विक्री न झालेल्या सदनिका (Pending sale of Flats / Shops) २) एफ. एस. आय....