सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये अध्यक्ष, सचिव या नंतर महत्वाची जबादारी असते ती खजिनदार यांची असते, खजिनदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने खालील जबाबदारी तसेच कार्ये पार पाडणे आवश्यक आहे:
१) दरमहा / तिमाही देखभाल शुल्क व इतर शुल्क बिल तयार करणे व सभासदांना पाठविणे.
२) सभासद किंवा सभासद व्यतिरिक्त व्यक्तीकडून येणारी रक्कम स्वीकारणे व त्यांना पावती देणे.
३) देखभाल शुल्क व इतर शुल्क यांची नोंदवही/ रजिस्टर अद्ययावत ठेवणे.
४) दरमहा / तिमाही सभासदांची थकबाकी यादी तयार करणे.
५) संस्थेला वेगवेगळ्या प्रकारची सेवा पुरविणाऱ्या संस्थांचे बिल घेऊन चेक तयार करणे, पेमेंट व्हाउचर बनविणे.
६) रोकड संभाळणे तसेच रोकड रजिस्टर आणि बँकेची रजिस्टर अद्ययावत ठेवणे.
७) खर्चाची फाईल इतर पदाधिकारी यांची मान्यता घेऊन अद्ययावत ठेवणे.
८) विविध कामांसाठी कोटेशन मागविणे.
९) चेक जमा करून रजिस्टर अद्ययावत ठेवणे तसेच सदर चेक बँकेत जमा करणे.
१०) सर्व आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवणे.
११) मासिक सभेत आवश्यक पत्रक सादर करणे उदा. मागील महिन्यातील सर्व जमा आणि खर्च.
१२) वार्षिक सभे पूर्वी लेखापारीक्षांसाठी आवश्यक सर्व बाबींच्या पूर्तता करणे.
१३) वेळेत लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल निबंधक व लेखापरीक्षण विभागास जमा करून पोहच घेणे.
१४) वार्षिक सर्वसाधारण सभेत हिशोबपत्रके व लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून त्यास मान्यता घेणे.
छोट्या गृहनिर्माण संस्थेत खजिनदार स्वतः वरील सर्व जबाबदारी व कार्य पार पडतो, मोठ्या गृहनिर्माण संस्थेत मध्ये त्यांच्या मदती साठी लेखापाल/ लिपिक यांची नियुक्ती करून त्यांच्याकडून कार्य करून घेतले जाते. परंतु अशा सर्व परिस्थितीत खजिनदार आणि इतर पदाधिकारी सयुंक्त रित्या जबाबदार असतात.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
धन्यवाद सर.कार्यकारीणी सदस्यांना अती उपयुक्त!
ReplyDelete