Saturday, 14 August 2021

सहकारी संस्थांच्या निबंधकाकडे कोणत्या बाबीसंबंधी तक्रार करू शकतात ?

सहकारी संस्थांच्या निबंधकाकडे खालील बाबतीत तक्रार दाखल करू शकतो.

१) खोटी माहिती सादर करून संस्थेच्या नोंदणी केल्याबाबत तक्रार 

२) दाखले दिले नाही तर.

३) संस्थेकडून नामनिर्देशन नोंदणी केली नही.

४) नॉन ऑक्युपन्सी चार्जेस.

५) जादा हस्तांतरण शुल्काची मागणी.

६) कागद पत्राच्या प्रती न मिळणे.

७) संस्थेच्या दप्तरामध्ये खाडाखोड, गोंधळ अथवा नष्ट करणे.

८) चेक अथवा कोणत्याही प्रकारचा पत्रव्हावहार कमिटीने न स्वीकारणे.

९) संस्थेचे दप्तर पूर्णपणे न सांभाळणे अथवा अर्धवट ठेवणे 

१०) ठराविक अवधीमध्ये संस्थेचे हिशोब आणि अहवाल तयार करणे.

११) संस्थेच्या निधीचा चुकीचा विनियोग अथवा निधी बाबत अफरातफर करणे.

१२) संस्थेच्या निधीची पूर्व समितीशिवाय गुंतवणूक 

१३) हिशोबाची फेरजुळवणी 

१४) लेखा परिक्षण 

१५) फेरलेखा परिक्षण

१६) समितीची मुदत संपण्या अगोदर निवडणुकांची व्यवस्था न करणे.

१७) उमेदवारी अर्ज नाकारणे 

१८) ठराविक मुदतीमध्ये सर्वसाधारण सभा न बोलाविणे 

१९) उपविधी मध्ये दर्शविल्या प्रमाणे समितीची बैठक आयोजित न करणे. 

२०) समितीचा राजीनामा.

२१) निबंधकाच्या अखत्यारीतीला इतर संबंधित विषय.


Monday, 9 August 2021

संस्थेच्या व्यवस्थापन समिती कडून सभासदाने केलेल्या तक्रारीवर ठराविक मुदतीमध्ये कारवाई न झाल्यास कोणाकडे तक्रार धाखल करता येईल?

 जेंव्हा एखादा सभासद कोणतीही तक्रार दाखल करतो त्यावर संस्थेच्या व्यवस्थापन समितीने उपविधी प्रमाणे तसेच सहकार कायद्या नुसार कार्यवाही करणे अपेक्षित असते. परंतु ज्यावेळी सदर तक्रारीवर ठराविक मुदतीत कारवाई होत नाही त्यावेळी सभासद खालील पैकी योग्य त्या कार्यालात/ न्यायालय मध्ये दाद मागू शकतो. ज्या कार्यालयाच्या कक्षेत सदर तक्रार येते त्या ठिकाणी सभासदाने दाद मागावी.

१) जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ ( District Housing Federation)

२) निबंधक कार्यालय ( Co operative Registrar Office)

३) सहकार न्यायालय ( Co operative Court)

४) जॉईन रजिस्ट्रार (Joint Registrar)

५) दिवाणी न्यायालय ( Civil Court)

६) पोलीस स्टेशन ( Police Station)

७) स्थानिक प्राधिकरण / महानगरपालिका ( Municipal Corporation)

धन्यवाद!

श्री. सचिन जगताप

फोन नंबर: ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


Sunday, 8 August 2021

संस्थेतील सामाईक क्षेत्रा मध्ये कोणत्या गोष्टींचा समाविष्ट होतो? Common Area and Assets of the Co operative Housing Society.

कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याच्या उद्देशा मागील महत्वाचा उद्देश म्हणजे संस्थेच्या इमारतीची, जागेची तसेच मालमत्तेची देखभाल व सुरक्षा करणे. त्यासाठी संस्थेमध्ये असे कोण कोणते क्षेत्र अथवा मालमत्ता आहेत ज्या संस्थेच्या मालकीच्या म्हणजेच सामाहिक मालकीच्या असतात हे आज आपण पाहणार आहोत. संस्थेच्या उपविधी प्रमाणे  सामाईक क्षेत्रे मध्ये खालील महत्वाच्या गोष्टींचा समावेश होतो.

२) क्लब हाउस व ती जागा.

३) स्विमिंगपूल आणि ती जागा.

४) जीमनॅशियम आणि त्याची जागा 

५) खेळाचे मैदान.

६) मंदीर व मंदिराची जागा

७) इमारतीचा पाया, इमारतीचे पिलर, टेरेस, जिना, प्रमुख भिंती, प्रवेशद्वार, पॅसेज

८) अंतर्गत येण्याजाण्याचा मार्ग 

९) संस्थेचे ऑफिस

१०) बेसमेंट, पार्किंग

११) पाण्याची टाकी

१२) लिफ्ट

१३) इतर काही जागा किंवा बांधकाम जे सामाहिक क्षेत्र म्हणून असू शकतात.     

धन्यवाद!

श्री. सचिन जगताप

फोन नंबर: ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


Saturday, 7 August 2021

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घ्यावयाचे विषय कोण कोणते आहेत? Agenda of Annual General Meeting.

प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेची ३० सप्टेंबर पूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. सध्या कोविड परिस्थिती मुळे सरकारने सन २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी काही वेगळी नियमावली दिली आहे तसेच वेळ वाढून दिला आहे.  या सभेची नोटीस हि पूर्ण १४ दिवसांची असावी. दोन वार्षिक सर्वसाधारण सभेमधील कालावधीत घेतल्या जाणाऱ्या सभेस विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्वाच्या विषयांवर चर्चा करणे तसेच त्यावर ठराव करून निर्णय घेणे आवश्यक असते. सदर महत्वाचे विषय पुढीलप्रमाणे.

१) मागील वार्षिक / विशे सर्वाधारण सभेचे इत्तीवृत वाचून कायम करणे.

२) संस्थेची आर्थिक पत्रके सदर करून त्यांना मान्यता घेणे.

३) लेखापरीक्षण अहवालाचे व त्यातील शेरे यांचे वाचन करून त्याबद्दल दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे.

४) पुढील आर्थिक वर्षासाठी तालीकेवरील लेखापरीक्षकाची नेमणूक करणे.

५) पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभेत मांडून त्यास मान्यता देणे.

६) मासिक वर्गणी वाढविणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेणे.

७) इमारतीचे व जागेचे मालकी हक्क हस्थांतरित करण्याचा ठराव करणे व त्यासाठी दोन व्यक्तीस सहीचे

अधिकार देणे.

८) सुधारित उपविधीला मंजुरी देणे.

९) सर्वसाधारण सभेच्या कक्षेत येणारा खर्च त्यावर चर्चा करून निर्णय घेणे.

१०) सभेपूर्वी सभासदाकडून आलेल्या लेखी सूचना व ऐनवेळी इतर महत्वाचे विषय अध्यक्षांच्या परवानगीने

घेऊ शकतात.

 

धन्यवाद!

श्री. सचिन जगताप

फोन नंबर: ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


Friday, 6 August 2021

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत घ्यावयाचे विषय कोण कोणते आहेत? Agenda for first General Meeting of Co operative Housing Society.

सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तीन महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक असते. हि सभा संस्थेचे मुख्यप्रवर्तकयांनी बोलवावी,  तीन महिन्यात सदर सभा न घेतल्यास त्यानंतर हि सभा घेण्याचे अधिकार निबंधक कार्यालयास असतात.  या सभेची नोटीस हि पूर्ण १४ दिवसांची असावी. पहिल्या सर्वसाधारण सभेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक असते. सदर महत्वाचे विषय पुढीलप्रमाणे.

१) संस्था नोंदणी नंतर ज्या सदनिका /गाळेधारक यांनी सभासदत्वासाठी केलेल्या अर्ज लक्षात घेऊन त्यांना सभासद करून घेणे.

२) संस्था नोंदणी पूर्वी झालेल्या खर्चाच्या विवरण पत्रास  मान्यता देणे.

३) संस्थेची हंगामी समितीची नेमणूक करणे व अधिकार सुपूर्त करणे.

४) जिल्हा फेडरेशन चे सभासद होणे.

५) लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे.

६) इमारतीचे व जागेचे मालकी हक्क हस्थांतरित करण्याचा ठराव करणे.

७) संस्थेचे बँक खाते उघडण्याचा ठराव करून भाग व प्रवेश फी ची रक्कम मुख्याप्रवर्तक यांच्या खात्यावरून संस्थेच्या खात्यात वर्ग करणे.

८) उपविधीला मंजुरी देणे.

९) संस्थेची मासिक वर्गणी ठरविणे.

१०) ऐनवेळी इतर महत्वाचे विषय अध्यक्षांच्या परवानगीने घेऊ शकतात.

 

धन्यवाद!

श्री. सचिन जगताप

फोन नंबर: ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८


संस्थेच्या जागेचे व बिल्डींगचे अभिहस्तांतरण पूर्ण न होण्याची किंवा अडथळा निर्माण करणारी कारणे कोणती ? (Reason behind Pending Conveyance of Land & Building of the society.)

अ) जमीन मालक/बिल्डर यांचे असहकार्य (Due to Land Owner/ Builder):- १) विक्री न झालेल्या सदनिका (Pending sale of Flats / Shops) २) एफ. एस. आय....