Tuesday, 19 December 2023

सदनिका / गाळा हस्तांतरण करताना संस्थेच्या सभासदाने कोणत्या कागदपत्रांची आणि बाबींची पूर्तता करावी? (Which Documents / Information are to be provided by Member who wants to transfer his Flat/ Shop?)

 उत्तर:- संस्थेतील सभासद ज्यावेळेस स्वत: ची सदनिका / गाळा दुसऱ्या व्यक्तीस हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस सभासदाने सदर हस्तांतरण करण्यापूर्वी किंवा करताना खालील कागदपत्रांची तसेच बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१) संस्थेच्या भाग भांडवलातील / मालमत्तेतील हितसंबंध व भाग यांची विक्री करण्याकरिता संस्थेस देवयाची नोटीस - परिशिष्ट क्र.२१ { उपविधी क्र.३८ (अ) } { Appendix 20 (1)/ (2) ( Bye law No.38 (a)}

2) संस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा देण्यासाठी संस्थेस द्यावयाची नोटीस - परिशिष्ट क्र.१३ { उपविधी क्र.२७ (अ) } { Appendix 13 ( Bye law No.27 (a)}

३) संस्थेच्या भाग भांडवलातील / मालमत्तेतील हितसंबंध व भाग हस्तांतरित करण्याकरिता करावयाचा अर्ज - परिशिष्ट क्र.२१ { उपविधी क्र.३८ (इ) (१) } { Appendix 21 ( Bye law No.38 (e)(1)}

४) अर्जा सोबत भाग दाखला (Share Certificate) 

५) हस्तांतरण शुल्क ( Transfer Fee) रु.५००/- प्रवेश शुल्क ( Entrance Fee ) रु.१००/-

६) हस्तांतरण अधिमुल्य ( Transfer Premium) सर्वसाधारण सभेतील ठरवा प्रमाणे पण ते  शासन निर्णया नुसार जे असेल ते.

७) कर्ज घेतले असेल तर त्या वित्तीय संस्थेकडून  ना हरकत दाखला / NOC from Bank/ Financial Institute.

८) जर आवश्यक असेल तर उपविधीत नमूद केलेले हमीपत्र / प्रतिज्ञा पत्र (Any other Declaration / Affidavit if Required).

संस्थेच्या जागेचे व बिल्डींगचे अभिहस्तांतरण पूर्ण न होण्याची किंवा अडथळा निर्माण करणारी कारणे कोणती ? (Reason behind Pending Conveyance of Land & Building of the society.)

अ) जमीन मालक/बिल्डर यांचे असहकार्य (Due to Land Owner/ Builder):- १) विक्री न झालेल्या सदनिका (Pending sale of Flats / Shops) २) एफ. एस. आय....